Best News Portal Development Company In India

तुळजापुरात बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणारी भामटी महिला गजाआड! ​नवीन बसस्थानकावरील घटना; तुळजापूर पोलिसांत भा.न्या.सं. ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल.

तुळजापुरात बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणारी भामटी महिला गजाआड!
​नवीन बसस्थानकावरील घटना; तुळजापूर पोलिसांत भा.न्या.सं. ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री क्षेत्र तुळजापूर येथील नवीन बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढण्याच्या गडबडीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिला भाविकाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेचा सविस्तर तपशील-
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील रमाबाई झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या व सध्या तिर्थ (खुर्द), ता. तुळजापूर येथे वास्तव्यास असलेल्या केसरबाई दामोदर गायकवाड (वय ७९ वर्षे) या दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक तुळजापूर येथून नळदुर्गकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या.
​बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपी महिला मिना बजरंग जाधव (रा. मंजुनाथ नगर, सोलापूर) हिने केसरबाई यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाची, सुमारे १५,००० रुपये किमतीची ४४ सोन्याचे मणी असलेली पोत/मंगळसूत्र शिताफीने चोरून नेले.

​पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
आपल्या गळ्यातील पोत चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी महिला मिना जाधव हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

​स्थानिक प्रशासनाकडून आवाहन-
तुळजापूर बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india