धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेस मोठे बळ; विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!
तुळजापूर प्रतिनिधी:-
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराप्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आणि धाराशिव लोकसभा खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या कार्यावरती विश्वास दाखवत आणि त्यांच्या उपस्थितीत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान अखिल भारतीय श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व सदस्य तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रमुख पक्षप्रवेशकर्ते-
अखिल भारतीय श्रमिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता.-
आनंद अंकुश भालेराव (प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य कामगार आघाडी, भाजपा तथा अखिल भारतीय श्रमिक महासंघ)
नंदकुमार मनाळे (उपाध्यक्ष)
सुहास साका (सचिव)
रवी पवार (खजिनदार)
राजारााम चंदनशिवे (मराठवाडा संघटक)
राजेश सय्यद (जिल्हाध्यक्ष), अशोक नाईकनवरे व बाळासाहेब माळी (जिल्हा उपाध्यक्ष)
संतोष यादव (तालुकाध्यक्ष), बबन चव्हाण (प्रमुख पदाधिकारी) आणि आशाताई बनसोडे (सोलापूर जिल्हाध्यक्ष)
तसेच बाळासाहेब तुपसुंदर, अविनाश कांबळे आणि किरणकुमार आवटे आदींनीही प्रवेश केला.
तसेच, तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातील अझरभाई मुजावर (माजी जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस), शंकर अविनाश जमादार (सरपंच, निलेगाव), गणेश लक्ष्मण कांबळे (माजी उपसरपंच, केशेगाव), मेहबूब फकीर (ग्रामपंचायत सदस्य, केशेगाव) यांच्यासह शिवशंकर हादरे, हारूनभाई शेख, दादा भोपळे, अफसर शेख, रामराजे पाटील, सतीश बागडे, दयानंद गायकवाड (माजी सरपंच, इटकाळ) आणि युनुस मकानदार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
संघटनात्मक बळकटीला मिळणार वेग-
याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या पक्षप्रवेशामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यात नवीन पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सहभाग वाढणार असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सोहळ्यास ऋषिकेश भैय्या मगर, सोमनाथ आप्पा गुरव, सुजित भैय्या हंगरकर, प्रतीक रोचकरी, सह्याद्री राजे निंबाळकर, विश्वजीत गुरव, शंकर सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, गफूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.










