Best News Portal Development Company In India

तुळजापूरच्या सोनारवाडीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा धडाका; गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप!

तुळजापूरच्या सोनारवाडीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा धडाका; गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप!

तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर तालुक्यातील सोनारवाडी येथे तुळजापूरचे आमदार मा. राणा जगजितसिंह पाटील (राणा दादा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध जनहितोपयोगी आणि सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार साहेबांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सोनारवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
​
सोनारवाडीसाठी मोठ्या विकासकामांची घोषणा
​गावाच्या मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार निधीतून-
​रस्त्यांची कामे पूर्ण करणे,
​महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह उभारणे,
​समाजमंदिर सभागृहाची निर्मिती करणे.
​हक्काचे घर: प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
​
महिला सक्षमीकरणासाठी १ लाखाचे अर्थसहाय्य
​महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या योजनेतून प्रति महिला ₹१,००,०००/- पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामध्ये ३५% अनुदान (सब्सिडी) मिळणार आहे. पात्र महिलांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, असे आमदार साहेबांनी सांगितले.
​
पाणीप्रश्न मिटवण्यासाठी तातडीची पावले
​गावाला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून दुसऱ्याच दिवशी तातडीने बोअरवेल घेण्याचे निर्देश देण्यात आले.
​नागरिकांच्या सोयीसाठी मोफत पाणी टँकर सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
​
१५० ते १७५ कुटुंबांना किराणा किटचे वाटप
​सामाजिक बांधिलकी जपत आमदार राणा दादा यांच्या हस्ते सोनारवाडीतील सुमारे १५० ते १७५ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
​यापूर्वी झालेली कामे: परिसरात यापूर्वी रस्ते, पथदिवे, स्मार्ट मीटर, पिण्याच्या पाण्याची टाकी, महिलांसाठी स्वच्छतागृह व पात्र कुटुंबांना मोफत रेशन कार्ड वाटप यांसारखी महत्त्वाची कामे मार्गी लावल्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
​
लोकप्रतिनिधींचा गौरव व मान्यवरांची उपस्थिती
​सोनारवाडीच्या विकासात सतत अग्रेसर असणाऱ्या नगरसेविका सौ. प्रियंका ताई विजय (सर) गंगणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. विजय सर गंगणे यांच्या कार्याची दखल घेत आमदार साहेबांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
​
या कार्यक्रमास नगराध्यक्ष विनोद (पिंटू भैय्या) गंगणे, अनिलजी काळी, आनंद दादा कंदले, पंडितरावजी जगदाळे, नरेश काका अमृतराव, उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी, सचिन भैय्या रोचकरी, मनोज आप्पा गवळी, जयकुमार पांढरे, वनील हंगरगेकर, बालाजी नाईकवाडी, प्रमोद भोरे, गणेश भिंगारे यांच्यासह विजय सर गंगणे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india