मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या संकल्पनेतून कवायत मैदान धाराशिव येथे किल्ला उभारणीच्या कार्याचे भूमिपूजन: विशेष पोलीस निरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते पार पडले!


तुळजापूर प्रतिनिधी. ; एकीकडे किल्ला संवर्धन कार्यक्रम महाराष्ट्र शासन हाती घेत आहे. गड किल्ले महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्या किल्ल्यांचा इतिहास आजही जिवंत आहे. किल्ला बांधणे हा विचार जरी नवीन असला तरी त्या मागची संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. यांच्या या नवीन किल्ल्यातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांची संकल्पना कौतुकास्पद आहे.
दि.२३-१-२०२६ रोजी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
तसेच मानणीय श्री. वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सभागृहात मीटिंग घेऊन .आगामी काळात होणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील कायदा व्यवस्था पोलीस कार्याचा आढावा घेतला. आणि जिल्ह्यातील अवैध धंदे, माला विषयी, आणि शरीराविरुद्ध उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सूचना केल्या. नजरेआड चालणाऱ्या अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्याचे सुचित केले.
भूमिपूजन समारोह वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक कु. मेघना, श्री सानप, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव श्री . विनोद इज्जपवार, पोलीस कल्याण श्री गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक श्री पठाण, इतर पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






