नळदुर्ग अक्कलकोट अर्धवट राष्ट्रीय महामार्गाने घेतला दुसरा बळी : संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची जनतेची मागणी
—————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग चे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून त्या अर्धवट राष्ट्रीय महामार्गाने नुकतच घेतला दुसरा बळी त्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळी असून संबंधित अधिकारी व गुतिदार यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी आडवल्यामुळे जागोजागी रखडले आहे ज्या ठिकाणी काम अडवले त्या ठिकाणी रोडवर मोठे मोठे खड्डे पडून प्रवासी वाहनधारकांना दळणवळणासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यावर पर्याय म्हणून ज्या ठिकाणी काम रखडले आहे त्या ठिकाणी पूर्वीचा रस्ता जेवढा होता त्याचे तात्पुरते डांबरीकरण करून दळणवळणासाठी हा रस्ता सुरळीत करण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन सहा ते सात महिन्यापूर्वीच त्या त्या ठिकाणी संबंधित अधिकारी यानी गुत्तेदार मार्फत रस्त्याचे डांबरीकरण केले खरे परंतु ते डांबरीकरणाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने सहा महिन्यातच जागोजागी उखडले पुन्हा दुरुस्त केले पुन्हा उखडले ते पुन्हा दुरुस्त केले असे सहा महिन्यात पूर्वी नव्याने झालेल्या डांबरीकरण कामाचे सहा वेळा दुरुस्ती करूनही ऊस वाहतूक ट्रॅक्टरने पुन्हा रस्ता जागोजागी उखडून खडी उघडी पडून मोठ मोठे खड्डे पडले. त्या रखडलेल्या आणि डाबरीकरण झालेल्या नळदुर्ग पासून काही अंतरावर गणेश मंदिराच्या जवळ या रोडवर मोठे मोठे खड्डे पडल्याने असून चार पाच दिवसापुर्वी चुंगी ता. अक्कलकोट येथील मोटार सायकल चालक सलीम फरीदा मुल्ला वय ६० वर्ष हे नळदुर्ग वरून चुंगीकडे जात असताना त्या रोडवर पडलेल्या खड्ड्यात गाडी स्लीप होऊन डोक्यावर पडल्याने दिनांक २८ जानेवारी २o२६ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही त्याच ठिकाणी एक मोटर स्वार गाडी स्लीप होऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या वर्ष दीड वर्षाभरात राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाने आणि निकृष्ट दर्जाच्या केलेल्या डांबरीकरणामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाने दोन मोटरसायकल स्वार प्रवाशांचा बळी घेतला.यामुळे या रस्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशी ग्रामस्था मध्ये संतापाची लाट उरुळली असून संबधित मुख्यकार्यकारी भाभियंता व गुत्तिदर यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा असी मागणी होत आहे.






