Best News Portal Development Company In India

मानवाने सुखी आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे; अरुण लोखंडे

मानवाने सुखी आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्त्वाचे पालन करणे गरजेचे आहे : अरुण लोखंडे
——————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड) :
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगातील संबंध मानव जातीसाठी मानवतेची शिकवण देणारा बौद्ध धम्म दिला असून मानवाने सुखी आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अरुण लोखंडे यांनी नंदगाव तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
या बाबत सविस्तर असे की, भारतीय दलित पॅंथर चे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख रिपब्लिकन चळवळीथील कार्यकर्ते पत्रकार शामकांत बळीराम नागिले यांच्या बौध्द नगर नंदगाव येथील रमाई निवासस्थानी बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया येथून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अरुण लोखंडे बोलत होते , पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विचारांची गरज असून बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणे बरोबरच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विचाराचे पदोपदी आचरण करणे महत्त्वाचे आहे.
प्रारंभी नंदगावचे सरपंच शशिकांत नागीले व शामकांत नागिले आणि त्यांच्या सहचारणी यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी एस के गायकवाड व सदानंद कांबळे अचलेर यांनी धम्म संस्कार विधी पार पाडला.
या प्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे डी.बी.एन.संस्थेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड अरविंद लोखंडे,ज्येष्ठ कार्यकर्ते रामलिंग गायकवाड, बुद्ध मूर्तीदाता सतीश सुरवसे,विजय कांबळे, सचिन कोरे ,सतीश काटे,सूरज गुड्डे,सागर चौगुले,दिगंबर वाघमारे,अमित लोंढे,अरविन्द दबडे,नंदकुमार गायकवाड,यमाजी लोखंडे,राजू माने,विजय गायकवाड,विठ्ठल घोडके,युवराज जेठीथोर,वालचंद कांबळे,मा.जिल्हा परिषद सदस्या रेखा गायकवाड, भिवा गायकवाड आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं(आठवले) पक्षाचे धाराशिव जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले,तर आभार शाम नागिले यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india