Best News Portal Development Company In India

जळकोट परिसरात अवकाळी पावसाचा तडाका हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

जळकोट परिसरात अवकाळी पावसाचा तडाका
हाता तोंडाला आलेला घास पावसाने हिरावला
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरात अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या ज्वारी गहू हरभरा द्राक्षे आधी पिकांचे आणि फळबागाचे नुकसान केले आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की दि २४ रोजी दुपारी ३ .३० वा . सुमारास अचानक पावसा झाल्याने शेतकऱ्यांची व मजुरदार वर्गाची धांदल उडाली तबल एक तास पेक्षा आधीक पाऊस झाला व सरीवर सरी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याची धावपळ उडाली शेतावर सध्या ज्वारी पिकाची व गहू हरभरा पिकांची काढणी चालू आहे काही अजुन हुरड्यात पिके आहेत अश्यात अचानक पावसाने झोडपले त्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरी राजाचे खूप खूप नुकसान झाले आहे यावर्षी पेरणीपूरक पाऊस झाला असुन बळीराजाने काळया आईची ओठी वेळेवर भरली होती काळ्या आईने सुद्धा शेतकऱ्यास भरभरून दिले होते पण मात्र निर्सगाच्या लहरीपणा मुळे हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्या सारखं झाले आहे रानावर काढून टाकलेली ज्वारीच्या कणासामधे पाणी जावून ज्वारी खराब होते तर उभी असलेली ज्वारी आडवी पडल्याने ज्वारी काळी पडून त्याच्यातील कस निघून जावून ज्वारी बेचव लागते त्यामुळे ज्ववारीला भाव लागत नाही हरभरा पिकांच ही तसंच आहे गहू पिकाचे नुकसान झालं आहे द्राक्ष बागायतदार आंबा उत्पादक कांदा उत्पादक आदी शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे तर जळकोट परिसरात विट भट्टी धारकांची संख्या भरपूर आहे कच्च्या विट बनवून ठेवलेल्या हाजारो विटाचे नुकसान झाले आहे संपूर्ण विटाचं चिकल झाला असून संपूर्ण मेहनत पाण्यात गेली अशी म्हणण्याची वेळ विट उत्पादकांवर आली आहे कारण शेकडो विट भट्ट्या जळकोट आणि परिसरात असून या पावसाने खूपच नुकसान झाल्याने शेतकरी आणि विट उत्पादक याचं कंबरडे मोडल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे . शासनाने नुकसान ग्रस्त शेतकरी बागायतदार विट उत्पादक यांच्या झालेल्या मालाचे पिकांचे पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे
हे निसर्गा आचानक येवून बरं नाही केलं
हाता तोंडाला आलेला आमचा घास हिरावून नेला अशी म्हणण्याची वेळी शेतकरी शेतमजुराची झाली आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india