Best News Portal Development Company In India

सावधान! तुळजापुरात चोरट्यांचा सुळसुळाट; भरचौकातून दुचाकी चोरीला ! ​तुळजापूर (प्रतिनिधी):

सावधान! तुळजापुरात चोरट्यांचा सुळसुळाट; भरचौकातून दुचाकी चोरीला !
​तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, भरवस्तीतून आणि गजबजलेल्या परिसरातून गाडी चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना नसून याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
​अशा गाड्या चोरणारे सापडणार कधी. ह्या भुरट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवाय पण दखल कोण घेतय का ? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भैय्यासाहेब उत्तरेश्वर बनसोडे (वय ३८ वर्षे, रा. पोलीस लाईन धाराशिव) हे दि. १२ मार्च २०२६ रोजी तुळजापूर येथे आले होते. दुपारी २:३० ते ३:३७ या दरम्यान त्यांनी आपली एमएच २५ बीएच १६११ (MH 25 BH 1611) क्रमांकाची मोटरसायकल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पार्क केली होती. काही वेळानंतर ते परतले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडी मिळून न आल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
चोरीला गेलेल्या या दुचाकीची अंदाजे किंमत ५५,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी भैय्यासाहेब बनसोडे यांनी १६ मार्च २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे अशी दबक्या आवाजात जनमानसात चर्चा आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india