Best News Portal Development Company In India

भारताच भवितव्य घडवणारे भारत भाग्य विधाते महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर- धम्मचारी सुचिरत्न !

*भारताच भवितव्य घडवणारे भारत भाग्य विधाते महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर- धम्मचारी सुचिरत्न*

 

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती प्रीत्यर्थ त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूर आयोजित व्याख्यानात धम्मचारी सुचिरत्न यांचे “डॉ बाबासाहेब आंबेडकर- भारत भाग्य विधाता” याविषयावर भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर येथे व्याख्यान झाले ।

 

बाबासाहेबांची भारताबद्दल दूरदृष्टी, त्यांचे तात्कालिक योगदान आणि त्याची आजची उपयुक्तता यावर धम्मचारी सुचिरत्न व्यक्त झाले ।

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धम्मचारी कल्याणदस्सी यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

या कार्यक्रमात खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला धम्मचारी सूचिरत्न – प्रमुख वक्ते व मा.डॉ. सदानंद कांबळे – सह. प्राध्यापक सिव्हील हॉस्पिटल लातूर, मा.डॉ. सचिन जाधव – सह. प्राध्यापक सिव्हील हॉस्पिटल लातूर , मा सुनील मांदळे – अध्यक्ष भारतीय दलित पॅंथर लातूर व मा. सचिन गायकवाड – नगरसेवक वंचीत बहुजन आघाडी या मान्यवरांचा शॉल, हार व बुध्दयान चा अंक देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धम्ममित्र मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले, तर धम्ममित्र संघमित्रा कांबळे यांनी डॉ.बाबसाहेबावरील सुमधूर गीत गायले, धम्ममित्रांच्या चमू ने पूजेचे नेतृत्व केले, धम्मचारी सुचिरत्न यांचा परिचय धम्ममित्र वैभव कीर्तीकर यांनी करून दिला,धम्मामित्र आशिष अजगरे आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या टिम ने स्टेज व्यवस्था व पूजास्थान केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले ।

 

या कार्यक्रमाला धाराशिव उमरगा येथील धम्मचारी रत्नपालीत, धम्मचारी ज्ञानपालित, धम्मचारी जीनघोष, धम्मचारी जिनोदय, धम्मचारी धम्मभूषण तसेच लातूर येथील मान्यवर प्रा. डॉ.दुष्यंत कटारे, माझी शिक्षण अधिकारी आर. पी. गायकवाड, मा. सागर साहेब, डॉ.भूषण दरकासे, आम्रपाल बनसोडे, प्रशांत मागणीकर, SBI बँकेचे अधिकारी, प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक व अन्य मान्यवर तसेच लातूर आणि परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूर केंद्रातील धम्मचारी तसेच धम्ममित्र जालिंदर कांबळे, अशोक कांबळे, रूपचंद जगताप, सुनील कांबळे, आशिष अजगरे, संकेत बनसोडे, गोपीनाथ कांबळे, सहदेव कांबळे, मनोज सूर्यवंशी, वैभव कीर्तीकर, संघमित्रा कांबळे, पद्मजा मोटे, मीना कीर्तीकर, पल्लवी कीर्तिकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail