धडाकेबाज कारवाई! जळकोट येथील भांड्यांच्या दुकानावरील दरोड्याचा छडा; लातूरचा सराईत गुन्हेगार जेरबंद, १.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
तुळजापूर प्रतिनिधी :-धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक दमदार कामगिरी भांड्याच्या दुकानातील चोरट्यांच्या मुद्देमाल जप्त करत मुस्क्या आवळल्या . धाराशिव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत मोठी कामगिरी बजावली आहे. जळकोट येथील एका भांड्यांच्या दुकानात झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, लातूर जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल १,७०,०५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एक अचूक सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान पोस्टे नळदुर्ग येथील गुरनं २७६/२६ कलम ३३१(४), ३०५(अ) भादंवि अन्वये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांच्या पथकाने पाळत ठेवून नरसिंग दत्तु माने (वय ३५ वर्षे, रा. तगरखेड, ता. निलंगा, जि. लातूर) या सराईत गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या इतर साथीदारांची नावेही निष्पन्न केली आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जळकोट येथील भांड्यांच्या दुकानातून चोरीस गेलेली खालील सामग्री जप्त करण्यात आली आहे. पितळी व तांब्याची भांडी, दोन नग एलईडी टीव्ही (LED TV)
एकूण किंमत: ₹१,७०,०५५/- चा मुद्देमाल
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नळदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोका शुभम बिराजदार (टीएडब्ल्यु) आणि चापोह नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अशाच काही संशयास्पद घटना दिसतात पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.







