Best News Portal Development Company In India

साकारात्मक द्रष्टिकोणातुन सातत्याने काम करत आलोय करत राहणार आमदार बसवराज पाटिल!

साकारात्मक द्रष्टिकोणातुन सातत्याने काम करत आलोय करत राहणार आमदार बसवराज पाटिल.
उमरगा/ लोहारा प्रतिनिधि आदिनाथ भालेराव.
धाराशिव,,लातुर ,बीड स्थानिक स्वराज्य संस्था, मतदारसंघातुन विधानपरिषदेवर विक्रमी मताने विजय संपादन केल्याबद्दल
श्रमजीवी परिवार,व उमरगा जनता सहकारी बँक लि,उमरगा यांच्या वतिने मा.आ.बसवराज पाटील यांचा आयोजित सन्मान सोहळा ओम बालाजी मंगल कार्यालय डिग्गी रोड उमरगा येथे संपन्न करण्यात आला .
यावेळी आ.बसवराज पाटिल आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित मान्वरासह नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा गणपतीची मुर्ती, शाल,फेटा,बुके देवुन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी हे होते तर प्रमुख अथिती म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा औशाचे आमदार अभिमन्यू पवार,मुरुम नगराध्यक्ष बापुराव पाटिल, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील,अदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार बसवराज पाटिल म्हणाले की, कोण जवळचे कोण लांबचे हे आम्ही कधिही पाहिले नाही साकारात्मक द्रष्टिकोणातुन सातत्याने काम करित राहिलो आणी पुढेही करत राहणार गरिब , वंचित, सोशित,शैक्षणिक सामाजिक, जबाबदारी मध्ये कुठेही कमी पडणार नाही पडु देणार नाही, संकोचित विचाराने वागल तर मीळालेल्या मोठेपणालाही कांही अर्थ राहणार नाही.
उमरग्याची शक्ती माझ्यामागे कायम आहे १९८४ साली श्रमजीवी शाळा सुरु केली या संस्थेने महाराष्ट्रात नाव लौकिक केले आहे. संस्थेची शिस्त ,गुणवत्ता,उत्कृष्ट आहे,
औसा तालुक्यातील विकासाबद्दल आमदार बसवराज पाटील बोलताना म्हणाले साकारात्मक विचाराचे प्रतिक औशाचे आमदार अभिमन्यू पवार आहेत महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीत वंचित असलेला औसा तालुका हा आज विकासाच्या दृष्टीने माँडर्न तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे, त्याचे एकमेव कारण चांगले लोकप्रतिनिधी लाभले आहेत .
सर्वच प्रश्नांची जान असलेले लोकप्रतिनिधींनी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत,असे आमदार बसवराज पाटिल आपल्या भाषणातून बोलत होते.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, जिल्हाध्यक्ष दत्त्ता कुलकर्णी कर्णाटकाचे विधानपरिषदेचे आमदार मारुतीराव मुळे अदिंची भाषणे झाली.
यावेळी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटिल, प्राचार्य राम सोलंकर, सरचिटणीस रामकृष्णपंत खरोशेकर,संचालक मल्लीनाथ दंडगे, जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण, मधुकर मोटे,विठ्ठल साईचे संचालक विठ्ठलराव बदोले,अँड.विरसंगय्या पाटील,दिलिप भालेराव, सरण्णाप्पा पत्रिके, केशव पवार,माजी पंचायत समितीचे उपसभापती मदन पाटील, अँड प्रविण तोतला,कविताताई मोरे, डॉ. शरणाप्पा मलंग,क्रषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, बाजार समितीचे माजी संचालक दयानंद सुर्यवंशी, माजी नगरसेवक सतिष सुरवशे,विक्रम मस्के,महेश माशाळकर,तुगावचे माजी उपसरपंच भालचंद्र लोखंडे,अदिंसह श्रमजीवी परीवार संचालक मंडळ ,उमरगा जनता सहकारी बँकेचे संचालक मंडळ कर्मचारी व्रंद, सोलापूर ,लातुर,धाराशिव जिल्ह्यातील जि.प.पं.स.पदाधिकारी, कार्यकर्ते ,नगरसेवक,आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india