जय भीम बोलो… धाराशिव चलो…’ : एस.सी. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये आंबेडकरी जनतेचा एल्गार!
तुळजापूर प्रतिनिधी;- २८ जुलै रोजी निघणार भव्य महामोर्चा; जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
शासनाकडून एस.सी. (अनुसूचित जाती) आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे. या “जातीयवादी शासनाच्या” धोरणाविरोधात आणि आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ‘जय भीम बोलो… धाराशिव चलो…’ अशी घोषणा देत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य ‘महामोर्चा व एल्गार’ संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि मोर्चाचे स्वरूप:
दिनांक व वेळ: मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता.
मार्ग/स्थळ: राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.
प्रमुख उपस्थिती: मा. सरसेनानी आनंदराज आंबेडकर, भंते सुमेध नागसेन, आणि भंते पैया बोधी या प्रमुख मान्यवरांची या मोर्चात विशेष उपस्थिती असणार आहे.
आरक्षण उपवर्गीकरणास तीव्र विरोध
शासनाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. या धोरणाविरोधात संपूर्ण आंबेडकरी जनता एकवटली असून, धाराशिवच्या भूमीत या अन्यायाविरोधात मोठा आवाज उठवला जाणार आहे.
राजमाता जिजाऊ चौकातून निघणारा हा भव्य महामोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल. या ऐतिहासिक महामोर्चात सर्व नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







