Best News Portal Development Company In India

जवळगा मे. येथे ‘जनता दरबार’ उत्साहात पार पडला; नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा!

जवळगा मे. येथे ‘जनता दरबार’ उत्साहात पार पडला; नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा!
​तुळजापूर प्रतिनिधी;- प्रशासनाचा कारभार थेट लोकांच्या दारी पोहोचवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत जवळगा मे. (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे ‘जनता दरबार व आढावा बैठक’ अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत गावातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकासकामांचा थेट आढावा घेण्यात आला.
​या विशेष प्रसंगी पंचायत समिती प्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
​पंचायत समिती सदस्य: मा. वैभव मराठी, मा. किसन देडे.
​ माजी उपसरपंच दादासाहेब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य देवानंद मस्के व इतर मान्यवर
​विशेष उपस्थिती: आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. बालाजी नन्नवरे
​प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी: विस्तार अधिकारी, ग्रामसेवक वीनेश कांबळे, सर्व संबंधित खात्यांचे शासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस.
​ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जनता दरबारात गावातील नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी थेट गावात हजर राहिल्याने नागरिकांनी आपल्या मूलभूत समस्या आणि विविध योजनांसंदर्भातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.
​उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत विविध प्रलंबित प्रश्नांवर त्वरित सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
​”प्रशासनाचा गावगाडा लोकांच्या दारी” ही संकल्पना या जनता दरबाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरल्याची भावना यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india