Best News Portal Development Company In India

भारतीय बौध्द महासभा जवळगा बेट शाखेचे उदघाटन बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते संपन्न!

*भारतीय बौध्द महासभा जवळगा बेट शाखेचे उदघाटन बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते संपन्न* उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव. (दि.३१)भारतीय बौद्ध महासभा संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरामध्ये वर्षावास कार्यक्रम राबविण्यात येत आहे,त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बीएसआय २५ मिशन उपक्रमांतर्गत उमरगा तालुका यांच्यावतीने ग्राम शाखा जवळगा बेट क्रमांक ९ चे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते दिनांक ३० जुलै २०२६ रोजी रात्री जवळगा बेट बुद्धविहार येथे संपन्न झाले. भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा जवळगा बेट उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अंगद गायकवाड हे होते तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व उद्घाटक तालुकाध्यक्ष बोधाचार्य उमेश सुरवसे, तसेच तालुका सचिव बालाजी गायकवाड, कीर्ती कुमार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाचे प्रतिमेचे पूजन पुष्पाने भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले व सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेच्या बोर्डाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर नूतन ग्राम शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तालुका उमरगा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत असताना भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचे आपण पदसिद्ध सभासद झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आहे मात्र त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संस्थेचे २४ शिबिर त्याचबरोबर वेळोवेळी संस्थेकडून येणारा आदेश याचे पालन करणे त्याचबरोबर समता सैनिक दलाचे प्रशिक्षण,महिलांचे प्रशिक्षण, श्रामनेर शिबिर, बाल संस्कार शिबिर,बाल श्रामनेर शिबिर,महिला उपासिका शिबिर, असे अनेक संस्कार घडवून आणणारे शिबिर आपण केले पाहिजेत व यामधून आपल्याला मिळणारे ज्ञान इतरांना देऊन त्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक राजे यांचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण यशस्वीपणे कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काही दिवसात आपले कार्यकर्ता शिबिर लावण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित रहावे अशी यावेळी सांगण्यात आले. यावेळी ग्राम शाखाध्यक्ष लक्ष्मी झाकडे, कोषाध्यक्ष सुवर्णा सुरवसे, सरचिटणीस सुभिद्रा गायकवाड, उपाध्यक्ष संरक्षण विभाग केसरबाई धनेराव, उपाध्यक्ष संस्कार विभाग अनिता गायकवाड, उपाध्यक्ष महिला विभाग अनुसया झाकडे, उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार प्रसार विभाग मैनाबाई कांबळे, संस्कार सचिव विजयाबाई गायकवाड, महिला सचिव श्रीदेवी गायकवाड, पर्यटन सचिव ललिता गायकवाड, संरक्षण सचिव मंगलबाई झाकडे, हिशोब तपासणीस अनिता गायकवाड , कार्यालयीन सचिव विमल गायकवाड , संघटक लक्ष्मी गायकवाड, रुक्‍मीनबाई गायकवाड, आम्रपाली गायकवाड, अनिता गायकवाड वर्षा कांबळे शोभा गायकवाड रमाबाई गायकवाड, सैनिक ज्ञानेश्वर गायकवाड तसेच जयदेव गायकवाड व दत्तू गायकवाड आशु सुरवसे आदीसर्वजनाची पदाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती कुमार गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बालाजी गायकवाड यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india