Best News Portal Development Company In India

श्रमजीवी परिवारां मुळेच समाज सेवेची प्रेरणा मिळाली – विनायकराव पाटील .

श्रमजीवी परिवारां मुळेच समाज सेवेची प्रेरणा मिळाली – विनायकराव पाटील .
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
भूक भाकरीची छाया झोपडीची …..
निवाऱ्यास द्यावी उब घोंगडीची ….
टिळा कपाळी ल्यालो वैराग्याचा ….
माया मोह सारे उगाळूनि प्यालो ….या संत तुकाराम महाराजांच्या विरक्त आणि निस्वार्थी जीवनाचा आदर्श घेऊन निस्वार्थी भावनेने समाजातील दुःख आणि वेदना सोसणाऱ्या माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रमजीवी परिवारा मुळेच मला समाज सेवेची प्रेरणा मिळाली आहे. परिवारातील माणसांच्या कौतुका मुळेच मला समाज सेवेचे बळ मिळाल्याची कृतज्ञता जेष्ठ समाजसेवक तथा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नुकताच विनायकराव पाटील यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . विजय फुलारी यांच्या हस्ते बीड येथील केएसके महाविद्यालयात गुरुवंदन २०२६ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते.
संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, संचालक मल्लीनाथ दंडगे , प्राचार्य डॉ.राम सोलंकर , प्राचार्य डॉ. विजयकुमार सरपे, प्राचार्य भीमाशंकर सारणे , प्राचार्य सैफन शेख, उपप्राचार्य राम माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विनायकराव पाटील यांचा संस्थेच्या वतीने रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .
पुढे बोलताना पाटील म्हणाले कि – खरं सौंदर्य रंगावरून नव्हे तर गुणक्ते वरून ओळखता आले पाहिजे. आपल्या त्यागातून आणि निस्वार्थ समर्थना मुळेच समाजातील सामान्य रंजल्या – गांजल्या माणसांचे दुःख हलके करण्याची शक्ती मिळते. निस्वार्थ मानव सेवा हि जीवनातील सर्वोत्कृष्ट आनंदोत्सव असतो. फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य करित रहा. आपल्या कर्तृत्वातून उत्कृष्ट समाज निर्मिती करण्या साठी पुढाकार घ्या.
पेपर फुटी, मराठी शाळांतील विद्यार्थी गळती इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते आकर्षण सुशिक्षित बेरोजगारी या विविध समस्या मुळे समाज व्यवस्था अस्थिर झाली आहे. सर्वच क्षेत्रातील अस्थिर परिस्थिवर मात करण्यासाठी आता प्रत्यकानीच पुढे येण्याची गरज आहे. एकमेंकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आता सर्वांनाच उत्कृष्ट व सुंस्कृत पिढ्या निर्माण करण्याचा निर्धार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा आदर्श अखंडीत ठेवण्याचे अवाहन त्यांनी केले.
या वेळी रामकृष्णपंत खरोसेकर यांचे भाषण झाले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.डॉ. सुधीर मठपती यांनी केले आभार प्रा.डॉ . धनंजय मेनकुदळे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india