Best News Portal Development Company In India

वागदरी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी!

वागदरी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी!
———————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
वागदरी ता. तुळजापूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठा उत्साहाने व विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथिल साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती वागदरीच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जयंती उत्सव समिती च्या वतीने जयंती निमित्ताने साहित्य रत्न आण्णा भाऊसाठे यांच्या जिवन चरित्र या विषयावर शालेय विद्यार्थ्याच्या निबंध व वकृत्व स्पर्धा,खाऊचे वाटप,शालेय साहित्याचे वाटप,आदी उपक्रम राबविण्यात आले. दि. १ आगस्ट रोजी सायंकाळी ७.०० वा आभिवादन सभा व स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकाना बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापिका नागिणी ताई सोमनाथ कांबळे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण क्षिरसागर, जिल्हा महिला अध्यक्षा तुळशाताई बनसोडे,तंटामुक्त गाव समिती वागदरीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच राजकुमार पवार आदी उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण क्षिरसागर बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे विज्ञानवादीअसून अंधश्रद्धेला मूठमाती देणारे व मानवी जीवनाचे वास्तव्य सांगणारे आहे.आपल्या मानवी हक्कासाठी आणि अन्या विरुध्द लढण्यासाठी प्रेरणारे असे सांगून त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कथा आणि कादंबरीचा आढावा आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून घेतला.या प्रसंगी आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापिका नागीणी ताई कांबळे यांचेही मार्गदर्शन पर भाषण झाले.प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव
डॉ.बाबासाहे आंबेडकर आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय (आढवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस. के.गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंती उत्सव समितीचे बाळू कांबळे यांनी केले.यावेळी ज्ञानेश्वर पाटील,अमोल पवार,किशोर सुरवसे,भालचंद्र यादव, किशोर धुमाळ, संदिपान वाघमारे,दत्ता कांबळे,बाळू भंडारे,सुर्यकांत वाघमारे, शंकर आप्पा भंडारे,सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, भानुदास लोंढे, रमेश वाघमारे,कांताबाई कांबळे, भिमाबाई भंडारे,रेखा झेंडारे, जिजाबाई जाधव, सह ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india