Best News Portal Development Company In India

ज्यांना चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनामध्ये पाच तत्वे पाळली पाहिजेत – बौद्धाचार्य उमेश सुरवसे*

*ज्यांना चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनामध्ये पाच तत्वे पाळली पाहिजेत – बौद्धाचार्य उमेश सुरवसे* उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि. ५) ज्यांना चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यांनी जीवनामध्ये पाच तत्वे पाळली पाहिजेत, कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, दारू न पिणे, इत्यादी गोष्टी पासून मनुष्याने दूर राहिल्यास हे विशुद्धी मार्गाच्या नियमानुसार चांगला मनुष्य होण्यास कोणतीही अडचण होणार नाही त्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलेल्या विशुद्धी मार्गावर आपण चालावे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बोधाचार्य उमेश सुरवसे यांनी तालुक्यातील चिंचोली भुयार येथील वर्षावास कार्यक्रमांमध्ये भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग व भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावरती बोलत असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखे अंतर्गत चिंचोली भुयार येथे वर्षावास कार्यक्रम २९ जुलै २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे दररोज वाचन व भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या ३२ विषयासह प्रवचन कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे दिनांक ३ ऑगस्ट चिंचोली भुयार येथील बुध्द विहार येथे तथागत भगवान बुध्द व बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे व शिंदे मामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले व धम्म ग्रंथाचे वाचन सुशांत शिंदे यांनी केले. यावेळी पुढे बोलत असताना सुरवसे म्हणाले की, भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणजे सदाचाराचा मार्ग आपण स्वीकारणे गरजेचे आहे त्यामध्ये सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, आणि सम्यक स्मृती,या सर्वांना प्राप्त करून घेण्यासाठी पाच अडथळे आपल्या मध्ये आहेत ते म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे लोभ, द्वेष,आळस, सुस्ती,आणि संशय या अनिश्चित पाच अडथळे आपल्या जीवनामध्ये येत असतात हे पाच अडथळे आपल्याला दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी सम्यक समाधी म्हणजे समाधी घेणे असा अर्थ नसून समाधी म्हणजे एकाग्रता वाढवणे गरजेचे असल्याचे मत बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी व्यक्त केले. यावेळी संगीता गायकवाड दैवत कांबळे मंगल गायकवाड अर्पणा थोरात गीता गायकवाड कमल शिंदे पंचशीला कांबळे मैनुबाई कांबळे कस्तुरा शिंदे पदमाबाई शिवशरणे शालुबाई शिवशरणी लक्ष्मी सुरवसे हौसाबाई भोसले अनुसया गायकवाड अर्चना शिंदे बेबी सरोजा शिंदे उजाला कांबळे सुवर्णा भोसले सविता गायकवाड छाया शिंदे सर्व उपस्थित महिला सह तरुण मुलं व मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india