*बहुजन हिताय वस्तीगृहात व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.वाजता, निवृत्त केंद्र प्रमुख मा. प्रकाश बिराजदार सर यांनी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना संस्कार संपदा व व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेताना शिक्षणापेक्षाही संस्कार आत्मसात करणे जास्त महत्वाचे आहे, कारण शिकलेला प्रत्येक जण संस्कारक्षम असेलच असे नाही पण संस्कारित झालेला प्रत्येक जन हा आदर्श व सभ्य समाजाचा स्तंभ असतो. आपणास सभ्य व आदर्श समाज उभारणीची सतत गरज असते. त्यासाठी स्वतःला तत्काळ ओळखून योग्य रीतीने स्वतःची जडणघडण करा. थोरांचे विचार संग्रहित करा व तसे स्वतःला वागण्याची प्रेरणा द्या. स्वयंशिस्त व अनुपालन करा. गुरुजनांचा व आपणास मदत करनाऱ्याचा आदर करा त्याविषयी नम्र आहे. मनाची विधायकता व एकाग्रता आणि नैतिकता हे उच्च व्यक्तित्वाचे गुण आहेत. गरिबी वाईट आहे ती पुसून टाका शिक्षणाने ही साध्य होऊ शकते. कमी वयातही अनेक महापुरुषांनी स्वतःस महाणपणं प्राप्त केले आहे.
याप्रसंगी वसतिगृहाचे संचालक वगरसेन कांबळे, प्रा मारुती कांबळे व शिक्षिका सुजाता घोडके वसतिगृह कर्मचारी विद्यार्थी हे उपस्थित होते.







