Best News Portal Development Company In India

तुळजापूरच्या शुक्रवार पेठेत जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी; लांढे कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल!

तुळजापूरच्या शुक्रवार पेठेत जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी; लांढे कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल!
​तुळजापू प्रतिनिधी:- जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना तुळजापूर येथील नेपती गल्ली (शुक्रवार पेठ) येथे घडली आहे. यात लोखंडी पाईप, काठी आणि झाऱ्याने मारहाण करून तीन जणांना जखमी करण्यात आले असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:४० वाजताच्या सुमारास नेपती गल्ली, शुक्रवार पेठ येथे हा प्रकार घडला. फिर्यादी विशाल राजेंद्र लांढे (वय ४०, सध्या रा. नवी सांगवी, पुणे) हे आपल्या मूळ गावी तुळजापूर येथे आले असता, जमिनीच्या कारणावरून वाद उफाळून आला.
​नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून विशाल लांढे, त्यांचा भाऊ विकास लांढे आणि बहीण संध्या नारायण धोंगडे यांना अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढल्याने आरोपींनी लाथाबुक्क्यांसह घरात वापरायचा झाऱ्या, लाकडी काठी आणि लोखंडी पाईपाने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी व त्यांचे नातेवाईक जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
​फिर्यादी विशाल लांढे यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे:
​नरेंद्र श्रीधर लांढे
​अनुराधा नरेंद्र लांढे
​व्यंकटेश नरेंद्र लांढे
​निर्जला नरेंद्र लांढे
​ऋषीकेश प्रमोद लांढे (सर्व रा. नेपती गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर, जि. धाराशिव)
​भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) कारवाई
​तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india