Best News Portal Development Company In India

आष्टा जहागीर येथे १५ आँगस्ट ८० वा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

आष्टा जहागीर येथे १५ आँगस्ट ८० वा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील आष्टा (जहागीर)येथे दि.१५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय प्रथमीक जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी ८:३०वाजता उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण नबी शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर सरपंच सतिष सोपान जमादार यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ९:३० वाजता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी.२ येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील महेश जाधव यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण पशुवैद्यकीय डॉ. महेबुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर भिमनगर परिसरातील भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन उत्तम राघु कांबळे यांच्या हस्ते करुन जेष्ठ नागरिक आशोकराव माधवराव गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
१० वाजता बुद्ध विहार परिसरात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा.मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते करून ग्रामपंचायत अधिकारी जी.डी.हलबुर्गे यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले .
व राष्ट्र गीताने सलामी देण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील चीमुकल्यांनाही खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी, मुख्याध्यापक सौ.एम.एस.ईंगोले, सह शिक्षक राम वाडीकर,सहशिक्षीका सौ.एम.टी.मोरे,ग्रामपंचायत सदस्या सौ.अर्चना सुर्यवंशी, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष सौ.वैष्णवी जाधव,ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ कांबळे, माजी उपसरपंच सौ.भाग्यश्री गायकवाड, महात्मा गांधी गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जीवन जाधव,क्रषी उत्तपन्न बाजारसमितीचे माजी संचालक दयानंद सुर्यवंशी, माजी एस.टी.वाहक उद्धव गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सूर्यवंशी, रघुनाथ भालेराव,अनिल गायकवाड, काशिनाथ गायकवाड,शिवाजी गायकवाड, निव्रत्ती जाधव, तुकाराम गायकवाड, शिवराम सुर्यवंशी, बिबिशन सुर्यवंशी,लक्ष्मण सुर्यवंशी,दत्तात्रय मोरे, सौ.वंदना सुर्यवंशी, सौ.रेखा सुर्यवंशी,सौ.संगीता भालेराव, सौ.लता सूर्यवंशी, सुर्यकांत सोनकांबळे, जिवन मोरे,विजय सूर्यवंशी, प्रविण मोरे,सचिन सूर्यवंशी, गोपिनाथ भालेराव, दिगंबर मोरे,
अंगणवाडी कार्यकर्ती सौ.सविता गायकवाड,सौ.सुनिता उर्फ आल्का जाधव ,मदतनीस सौ. ज्योती कुलकर्णी,सौ.शिल्पा मोरे,आशा कार्यकर्ती सौ.रोहिणी नंदकुमार जाधव ,ग्रामपंचायत संगणक चालक बालाजी कांबळे,शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड, प्रसाद (हणुमंत) गायकवाड, अदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india