वाढते इंटरनेट चे व्यसन ही विद्यार्थी आणि युवकांसाठी चिंतेची बाब आहे – मारुती बनसोडे
————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
जगातील सर्वात तरुण देश म्हणून जग भारताकडे पाहत असताना अमली पदार्थांच्या व्यसना सोबतच आता इंटरनेटचे वाढते व्यसन ही भारतातील विद्यार्थी व युवकासाठी चिंतेची बाब ठरत आहे याला ही आता समजून घेण्याची गरज आहे असे मत राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त आणि नशा बंदी मंडळ धाराशिव चे जिल्हा संघटक तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
दिनांक १९/०८/ २o२६ रोजी केशेगाव ता. तुळजापूर येथील साने गुरुजी विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दारू, गुटखा, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स या व्यसनाचे दुष्परिणाम सांगत असताना आता इंटरनेट चे व्यसन पण फार वाढत आहे त्यामुळे ही दृष्टी दोष, कर्न दोष, आणि मानवी मेंदूवर होणारे अनिष्ट परिणाम याबाबत ही माहिती दिली. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धाराशिव, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. साने गुरुजी विद्यालयात श्री. कुंभार सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री प्रकाश कांबळे सर मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला साने गुरुजी विद्यालयात ११७ विद्यार्थी उपस्थित होते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १९९ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माहिती पत्रक वाटप करण्यात आले शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्तीची शपथ घेतली.







