रिपब्लिकन चळवळीतील बहुजनाच खंबिर नेतृत्व : राजा भाऊ सरवदे!
————————————————–
♦️महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून मूलभूत हक्क आणि मानवी अधिकार घटनात्मक दृष्ट्या मिळवून दिले परंतु जोपर्यंत सत्तेची चावी बहुजनांच्या हाती येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बहुजनाचा विकास होत नाही हे मर्म जाणून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याकरिता व देशाच्या सत्तेत जाण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना खुल्या पत्रातून मांडली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित स्थापन झालेल्या आणि सध्यस्थितीत नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची चळवळ देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याकरिता केंद्रीय आणि राज्य कार्यकारणितील अनेक निष्ठावंत बुद्धिजीवी कार्यकर्ते काम करीत आहेत. सत्तेतील वाटा मिळो किंवा न मिळो पण बाबासाहेबांचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष जिवंत राहावा आणि आपल्या न्याय हक्कासाठी सत्ताधारी पक्षावर किमान योग्य तो अंकुश ठेवण्यासाठी कार्यकर्ते नेते अत्यंत निष्ठने आणि संपूर्ण ताकतीने रिपब्लिकन पक्षाचे काम करीत आहेत.त्यामध्ये सोलापूरचे सुपुत्र बहुजनांचं खंबीर नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे माजी चेअरमन नामदार राजा भाऊ सरवदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक चळवळीला सुरुवात करणारे राजा भाऊ सरवदे यांचं नेतृत्व म्हणजे समाजकारण जोपासत राजकारण करणारे खंबीर असे नेतृत्व होय. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करत असतानाच महाराष्ट्रात नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पॅंथरचा झुंजावात सुरू असतानाच पॅंथर रामदास आठवले साहेब यांची भेट राजाभाऊ यांना झाली आणि त्याचक्षणी त्यांनी रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅंथरच्या चळवळीमध्ये उडी घेतली आणि सोलापूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तमाम खेडोपाड्यात जाऊन भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून शाखा स्थापन करून त्यांनी गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केलं करित आहेत. दरम्यानच्या काळात मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलं पाहिजे यासाठी विद्यापीठ नामांतराची चळवळ चालू होती.या नामांतराच्य लढाईमध्ये ही राजा भाऊ अग्रेसर होते. विद्यापीठ नामांतरासाठी अनेक मोर्चे आंदोलने काढून मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार होईपर्यंत राजा भाऊंचा लढा हा रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालूच होता. सन १९८९ ला दलित पॅंथरचे विलीनीकरण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.त्या दिवसापासून ही राजाभाऊ सरवदे यांनी नामदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोर्चे आंदोलने काढून उपेक्षितांच्या गोरगरिबांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा मोठा हात खंड आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यानी समाजकारण, राजकारणा बरोबरच शैक्षणिक चळवळीवर ही भर दिला.विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडीअडचणींनी राजाभाऊ यांनी सोडविल्या.एवढ्यावर न थांबता स्वतः एक शिक्षण संस्था ही स्थापन केली आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिका!संघटित व्हा! संघर्ष करा! हा मूलमंत्र प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी जोपासला व जोपासत आहेत.
सोलापूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यानी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करून एक प्रचंड ताकद सोलापूर जिल्ह्यात असल्याचे दाखवून दिले.अनेकांनी रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत सत्ता मिळवली पद मिळवले आणि नंतर आठवले साहेबांची साथ सोडून स्वतःच नेते झाले पण राजाभाऊ सरवदे यांचं मोठेपण यातच आहे की त्यांनी गेली ४० ते ४५ वर्ष एक पक्ष एक नेतृत्व एकच झेंडा यापासून ते कधीच तसूभर ही ढळले नाहीत. सत्तेतील वाटा मिळो न मिळो पद मिळो किंवा न मिळो पण एकच नेतृत्व म्हणजे रामदास आठवले साहेब एकच पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष एकच झेंडा तो म्हणजे निळा झेंडा अशा एकनिष्ठतेचा प्रवास आजतागायत चालू आहे. सध्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून ते रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व संबंध महाराष्ट्रभर करतात. त्यांच्या प्रामाणिकपणे निष्ठेने करत असलेल्या कामाचं फळ म्हणजे सन २o१८ मध्ये राज्य मंत्री पदाचा दर्जा असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या चेअरमन पदी झालेली निवड होय. काम आणि निष्ठाच त्यांच्यापर्यंत पद आणि सत्ता घेऊन आले. असं म्हटलं तर वावग ठरत नाही. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून केलेलं काम सरचिटणीस पद असेल त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेली निवड असेल आणि महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन म्हणून मिळालेली संधी असेल हे सर्व त्यांच्या एकनिष्ठतेचा प्रामाणिकपणे केलेल्या जनतेच्या सेवेची त्यांना मिळालेलं पावती आहे. आजही ते तितक्याच ताकतीने तितक्याच जोमाने तितक्याच विश्वासाने आणि तितक्याच निष्ठेने ते रिपब्लिकन पक्षाचं नामदार रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. तरुणांना लाजवेल असं काम त्यांच आहे. राजाभाऊ सरवदे म्हणजेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची शक्ती प्रेरणा स्त्रोत आहे असंच म्हणावं लागेल.रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय विचार सर्वत्र तळागाळातील जनते पर्यंत पोहचंविण्याच कार्य राजाभाऊ सरवदे हे प्रामाणिकपणे करीत आहेत.
परंमपुज्य बौध्दीसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्म क्रांती केली आणि बहुजनांना स्वाभिमानाने सन्मानाने कर्मकांड मुक्त जीवन जगण्यासाठी बौद्ध धम्म दिला. त्या सदधम्माचे पाईक म्हणून राजाभाऊ सरवदे हे धम्म कार्यातही तितकेच सक्रिय आहेत.त्यांच्या एकूणच कार्याला क्रांतिकारी जय भिम आणि दि.२६ ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा.
एस. के. गायकवाड
मु. पो. वागदरी ता. तुळजापूर
मो. न. ९३७००४०२०३
( लेखक रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते आहेत )







