Best News Portal Development Company In India

सर्व संतानी, समाज सुधारकांनी व्यसनाला विरोध केला आहे – मारुती बनसोडे

सर्व संतानी, समाज सुधारकांनी व्यसनाला विरोध केला आहे – मारुती बनसोडे
——————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
महाराष्ट्रातील सर्व संतानी व समाज सुधारकांनी व्यसनाला विरोध केला आहे आपल्या राज्याला संत, समाज सुधारकांचा मोठा वैचारिक वारसा लाभलेला आहे या सर्वांनी व्यसनाला विरोध केला आहे याची जाणीव सर्व विद्यार्थी व युवकांनी ठेवून आपण ही व्यसनाला विरोध करावा व सक्षम भारत घडविण्यासाठी नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र चे धाराशिव जिल्हा संघटक आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी केले आहे.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27/08/2026 रोजी कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जाणीव जागृती व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा संघटक मारुती बनसोडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पिसे सर होते यावेळी पुढे बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की दारु, तंबाखू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स हे व्यसन आज मोठ्या प्रमाणात आहे त्याच बरोबर इंटरनेट चे व्यसन ही फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून यापासून ही विद्यार्थी व युवकांनी आता सावध होण्याची गरज आहे असे सांगितले या कार्यक्रमात 550 विद्यार्थी व 19 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची शपथ देण्यात आली

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india