Best News Portal Development Company In India

साखरेच्या दरवाढीने सणासुदीला महागाईचा गोड धक्का; गोरगरिबांचे बजेट कोलमडले!

साखरेच्या दरवाढीने सणासुदीला महागाईचा गोड धक्का; गोरगरिबांचे बजेट कोलमडले!

तुळजापूर प्रतिनिधी:- जुलैमध्ये ४० रुपये किलो असलेली साखर आता ६० ते ७० रुपयांच्या घरात; गणेशोत्सवातील मोदक-लाडूंसह महालक्ष्मीच्या नैवेद्यालाही महागाईची झळ — साखरेच्या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादकांना मिळणार का? महागाई बाबत विरोधक काची तोंडावर बोट

श्रावण मास, गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सण तोंडावर आले असतानाच साखरेच्या दराने गगनाला गवसणी घातल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील काही महिन्यांत सुमारे ४० रुपये किलो असलेली साखर आता बाजारात ६० ते ७० रुपये किलोच्या आसपास विकली जात असल्याने गोरगरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘विघ्नहर्ता’ गणरायाचे स्वागतही यंदा महागाईच्या सावटाखाली होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
महागाई बाबत कुणीही बोलत नसल्याने विशेषता विरोधकही शब्द काढत असल्याने सर्वसामान्य जनता महागाईत भरडली जात आहे
जुलै महिन्यात साखरेचा दर सुमारे ४० रुपये किलो होता. १ ऑगस्टनंतर तो ४५ रुपयांवर गेला आणि त्यानंतरच्या काळात दरात झपाट्याने वाढ होत साखर ६० ते ७० रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. अवघ्या काही दिवसांत झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्याचबरोबर गुळाच्या दरातही सुमारे १८ ते २५ रुपयांनी वाढ झाल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.
सणासुदीचा खर्च वाढणार?
गणेशोत्सव आणि महालक्ष्मीचा सण अवघ्या १५ ते २० दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात मोदक, लाडू, करंजी, पुरणपोळी तसेच विविध गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. मात्र साखरेबरोबरच खाद्यतेल, शेंगदाणे, खोबरे आणि अन्य जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे यंदा सण साजरा करण्याच एक आव्हान सर्वसामान्य पुढे आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india